1

मागील आठवड्यात मिनकी ता.बिलोली जि. नांदेड येथे दुर्दैवी घटना घडली 

शालेय साहित्य घेऊन देण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्यामुळे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शेतात जाऊन झाडाला दोर बांधून आत्महत्या केली. दुपारी त्या विद्यार्थ्यांच्या 'शेतकरी बापाला' कोणीतरी सांगितलं की मुलाने शेतात आत्महत्या केली आहे, बाप धावत शेतात गेला, झाडावर चढून मुलाचे प्रेत खाली उतरवलं 

आणि त्याच झाडाला तोच दूर बांधून बापाने देखील 'आत्महत्या' केली

एकीकडे काहीजण करोडोंची संपत्ती लपवायला जागा शोधताय आणि दुसरीकडे एक शेतकरी बाप पोराला शालेय साहित्य घेता येत नाही म्हणुन आत्महत्या करतोय...!

ती किती प्रचंड विरोधाभासाचा चित्र आहे.. 

मुलानेच काय परंतु बापाने सुद्धा आत्महत्या करायला नको होती... हेच तुमच्यासारखं माझंही मत आहे.

 परंतु एखाद्या मुलाला शालेय साहित्य घेता येत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत असेल.. आणि एखाद्या शेतकऱ्याला आपल्या मुलाला आपण शैक्षणिक साहित्य घेऊन देऊ शकत नाही म्हणून आत्महत्या करायची वेळ येत असेल तर इथल्या व्यवस्थेने चिंतन करणे गरजेचे आहे..

त्या कुटुंबातील उर्वरित दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिवनिश्चल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत, परंतु कधी कधी मला प्रश्न पडतो की

की आम्ही शेतकऱ्यांना त्यांचा वाटा देतोय का ?

चित्रपट टॅक्स फ्री करता, वाय-फाय फ्री देता.. मग कधीतरी शिक्षण पण फ्री देण्याचा प्रयत्न करा ना...

या मुलांनी शिकावं..आत्महत्या-गुन्हेगारी सारखं पाऊल उचलू नये याचसाठी आमचा शिवनिश्चल परिवार मागील बारा वर्षापासून काम करतोय...

माझी आपणास विनंती आहे की आपण देखील शिवनिश्चल परिवारात सामील व्हा आणि का राष्ट्र उभारणीच्या चांगल्या कार्याचे साक्षीदार व्हा...

यशवंत गोसावी 
अध्यक्ष शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट